voicemaharashtralive.news

News Header

अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षामुळे शेकडो उड्डाणे रद्द झाली असून हजारो प्रवासी अडकले आहेत.

Monday, 02 March 2026, 10:26

America Israel Iran War: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर आखाती देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. त्यामुळे मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इराण–इस्रायल संघर्षाचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत.

युद्धविरामासाठीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढला असून अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहे. उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

अमेरिका–इराण–इस्रायल युद्धाचा शेकडो विमानांना फटका

मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरांटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसकडे जाणारी एअर इंडियाची रविवारी–सोमवारीची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. अडकलेल्या भारतीय प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया प्रयत्न करत आहे. तसेच इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे स्थगित केली आहेत. याचा परिणाम मुंबई–लंडन सेवांवरही झाला आहे. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान रविवारी मध्यरात्री मुंबईत उतरवण्यात आले.

रीबुकिंगबाबत माहिती न मिळाल्याने प्रवासी संभ्रमात

बहरीनमार्गे अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना रीबुकिंगची स्पष्ट माहिती न मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. मुंबईहून मक्का–मदीना उमरासाठी जाणारे प्रवासीही अडकले आहेत. अबू धाबी, बहरीन आणि इस्तंबूलकडे जाणारे अनेक प्रवासी विमानतळावरच थांबले आहेत. उड्डाणे रद्द झाल्यामुळे मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली असून अमेरिका आणि युरोपकडे जाणाऱ्या सेवांवरही परिणाम झाला आहे.

दरम्यान, सोमवारीपर्यंत उड्डाणे रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी एअर इंडियाने दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो, टोरांटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसकडे जाणाऱ्या सेवा स्थगित केल्या. इंडिगोनेही पश्चिम आशिया व काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे रद्द केली आहेत.

भारतीय विमान कंपन्यांनी सोमवारी, ३ मार्चपर्यंत या भागातील सर्व उड्डाणे थांबवली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाइसजेट यांनीही मध्यपूर्वेकडील सेवा रद्द किंवा स्थगित केल्याचे सांगितले आहे.

More from this category

पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस

मतदार राजा जागा हो! तुमचा मतदान हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच नाव सत्यापित करा

सोने स्वस्त! ताई, बाई, आक्का – आता खरेदीची सुवर्णसंधी! 💰✨

इराणविरोधात हल्ले थांबवू नका; गल्फ देशांचा अमेरिकेला गुप्त संदेश

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा