IAS आणि IPS सेवांमध्ये SC, ST आणि OBC अधिकाऱ्यांची अचूक संख्या किती? सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
नवी दिल्ली :
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत देशातील प्रतिष्ठित IAS, IPS आणि IFS सेवांसाठी भरती केली जाते. 2020 ते 2024 या मागील पाच वर्षांत आरक्षित प्रवर्गातील किती उमेदवारांची निवड झाली, याबाबतची माहिती समोर आली आहे. सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार OBC, SC आणि ST प्रवर्गातील सर्वाधिक उमेदवारांची नियुक्ती भारतीय पोलीस सेवेत (IPS) झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभेत कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार, UPSC नागरी सेवा परीक्षेअंतर्गत 2020 ते 2024 या कालावधीत थेट भरतीद्वारे विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
IAS (भारतीय प्रशासकीय सेवा)
OBC: 245
SC: 135
ST: 67
IPS (भारतीय पोलीस सेवा)
OBC: 255
SC: 141
ST: 71
IFS (भारतीय वन सेवा)
OBC: 231
SC: 95
ST: 48
एकूण तीनही सेवांमध्ये
OBC : 731 उमेदवार
SC: 371 उमेदवार
ST : 186 उमेदवार
या आकडेवारीनुसार, IAS आणि IFS च्या तुलनेत IPS मध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या अधिक आहे.
दरम्यान, UPSC मार्फत जाहीर होणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचेही समोर आले आहे. 2024 : 1,056 पदे, 2025: 979 पदे, 2026: फक्त 933 पदे. गेल्या तीन वर्षांत जाहिरातीत येणाऱ्या पदांची संख्या कमी होत असल्याने उमेदवारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
IAS, IPS आणि IFS मधील रिक्त पदांची स्थिती
1 जानेवारी 2025 पर्यंतच्या सिव्हिल लिस्टनुसार सेवांमधील रिक्त पदांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे
IAS:
मंजूर पदे : 6,877
रिक्त पदे : 1,300
IPS:
मंजूर पदे : 5,099
TEEE 2026
रिक्त पदे: 505
मंजूर पदे : 3,193
रिक्त पदे : 1,029
सर्वाधिक रिक्त पदे भारतीय वन सेवा (IFS) मध्ये असून, त्यानंतर IAS आणि IPS चा क्रम लागतो.