voicemaharashtralive.news

News Header

जेव्हा एका प्रवाशाने विमानात अशी अनोखी मागणी केली, तेव्हा एअर होस्टेसनेही ती मान्य केली – हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे!

Tuesday, 24 March 2026, 11:11

विमानात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमधील वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, एका प्रवाशाची वेगळीच इच्छा ऐकून एअर होस्टेस सुरुवातीला थोड्या गोंधळल्या. पण विमान लँड झाल्यानंतर त्यांनी त्या प्रवाशाची इच्छा पूर्ण केली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या वेगवेगळ्या आणि कधी कधी विचित्र मागण्यांमुळे एअर होस्टेसना मोठा ताण सहन करावा लागतो. काही वेळा प्रवासी एकमेकांशी वाद घालत असतात, तेव्हा विमानातील कर्मचाऱ्यांची खर्‍या अर्थाने परीक्षा होते. अनेकदा प्रवाशांच्या अनपेक्षित मागण्यांमुळे एअर होस्टेस अडचणीत येतात. अशातच एका प्रवाशाने एअर होस्टेसकडे एक अनोखी मागणी केली, जी अखेर त्या हवाई सुंदरीला पूर्ण करावी लागली.

इंस्टाग्रामवरील @vanshmotwani23 या हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या सुंदर अनुभवासाठी तो एतिहाद एअरवेजचा कायम ऋणी राहील, कारण संपूर्ण फ्लाइट स्टाफ खूपच नम्र आणि मदतशील होता. व्हिडिओमध्ये दिसते की, लँडिंगनंतर एका भारतीय प्रवाशाने एअर होस्टेसकडे कॉकपिट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी एअर होस्टेसने त्याची निराशा न करता ती इच्छा पूर्ण केली. हा व्हिडिओ सध्या युजर्सची मनं जिंकत आहे.

एका प्रवाशाने फ्लाइटमध्ये एअर होस्टेसकडे कॉकपिट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. लँडिंगनंतर त्याला यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर तो कॉकपिटमध्ये जाऊन हा खास अनुभव आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो.एतिहाद एअरवेजच्या या उड्डाणादरम्यान, एका सामान्य प्रवाशाच्या विनंतीला केबिन क्रूने सकारात्मक प्रतिसाद देत तत्परता दाखवली, याचे सध्या कौतुक होत आहे. वंश मोटवाणी यांनी इंस्टाग्रामवर या अनुभवाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते फ्लाइट अटेंडेंटला कॉकपिट दाखवण्याची विनंती करताना दिसतात. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणादरम्यान अशी विनंती सहसा मान्य केली जात नाही, त्यामुळे सुरुवातीला फ्लाइट अटेंडेंट सावधपणे उत्तर देते. मात्र, ती प्रवाशाला सांगते की विमान लँड झाल्यानंतर त्याची ही इच्छा पूर्ण केली जाईल.

फ्लाइट अटेंडेंटने दिलेल्या आश्वासनानुसार विमान लँड झाल्यानंतर त्या प्रवाशाला कॉकपिटमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. कॉकपिटमध्ये गेल्यावर त्याने पायलटशी संवाद साधत हा खास अनुभव घेतला. एअरलाईनच्या स्टाफचे हे सौजन्य पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.
या प्रवाशाने व्हिडिओ शेअर केल्यानंतर एतिहाद एअरवेजनेही त्यावर प्रतिक्रिया देत चांगल्या अभिप्रायाबद्दल त्याचे आभार मानले. तसेच, भविष्यातही असा प्रवास एकत्र होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

 

 

More from this category

पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान; आधीच मजुरांची कमतरता आणि त्यातच पावसाचा आणखी फटका.

मतदार राजा जागा हो! तुमचा मतदान हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच नाव सत्यापित करा

सोने स्वस्त! ताई, बाई, आक्का – आता खरेदीची सुवर्णसंधी! 💰✨

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा