मतदार राजा जागा हो! तुमचा मतदान हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच नाव सत्यापित करा
भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभर Special Intensive Revision (SIR) ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराने आपले नाव 2002 च्या मतदार यादीतील माहितीसोबत verify करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी आपले नाव तपासण्यासाठी voter.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा ECINET mobile app चा वापर करावा. त्यामध्ये Search Your Name in Last SIR हा पर्याय निवडून माहिती तपासता येणार आहे.
जर नाव सापडले तर मतदारांनी खालील माहिती नोंदवावी:
मतदार संघ क्रमांक
यादी भाग क्रमांक
यादीतील अनुक्रमांक
यानंतर ही माहिती आपल्या भागातील BLO (Booth Level Officer) यांच्याकडे देऊन सध्याच्या मतदार यादीशी नाव मॅप करणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाने असेही सांगितले आहे की, जर एखाद्या मतदाराचे नाव 2002 च्या यादीत नसेल तर त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांची माहिती BLO कडे जमा करावी.
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.