voicemaharashtralive.news

News Header

मुंबई BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

Monday, 23 February 2026, 11:15

मुंबई :

मुंबई महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत (Mumbai BMC Job Scam) मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील तब्बल ४३ जणांकडून सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई महानगरपालिका (बीएमसी)चे नाव वापरून बनावट आश्वासने देण्यात आली. यासंदर्भात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नातेवाईकांमार्फत संपर्क; नोकरीची हमी 

सांगलीतील अनिकुमार गोंजारी (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२४ मध्ये त्यांची ओळख माया चव्हाण (वय ५१) हिच्याशी नातेवाईकांच्या माध्यमातून झाली. संबंधित महिला मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड (कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क असल्याचा दावा करत तिने विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याची हमी दिली.

विविध पदांसाठी लाखो रुपयांची मागणी

तक्रारीनुसार, शिपाई, लिपिक, आर.ए. लिपिक आणि हेड क्लर्क या पदांसाठी प्रत्येकी ७.५० लाख ते ९.५० लाख रुपये मागण्यात आले. सुरुवातीला अर्ज व फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम स्वीकारण्यात आली. त्यानंतर उमेदवारांकडून शैक्षणिक व इतर कागदपत्रे घेतली गेली. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर (पूर्व) येथील पारेख हॉस्पिटलमध्ये केल्याचा आरोप आहे. यासाठी प्रत्येकाकडून १० हजार रुपये रोख घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

ऑनलाइन आणि रोख व्यवहारातून लाखोंची उकळपट्टी 

ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे सुमारे २४ लाख ६८ हजार रुपये जमा करून घेतल्याचे समोर आले आहे. तसेच, मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन अंदाजे ६ लाख ३० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. या सर्व व्यवहारांचा मिळून फसवणुकीचा आकडा सुमारे ३३ लाख रुपयांपर्यंत गेल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

महिला केवळ शिपाई पदावर

More from this category

मतदार राजा जागा हो! तुमचा मतदान हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच नाव सत्यापित करा

व्हॉईस महाराष्ट्र LIVE : बारामतीत पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रवादींची जमावबंदी; रोहित पवारांची DGCA विरोधात अधिकृत तक्रार!

भारत बंद 12 फेब्रुवारी 2026: कामगार संघटनांचा देशव्यापी संप – काय आहे पार्श्वभूमी?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, महिलांना पुन्हा मिळणार संधी

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा