voicemaharashtralive.news

News Header

PNB भरती 2026: पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती; ५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Tuesday, 17 February 2026, 11:19

Punjab National Bank Recruitment 2026 :तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेने तब्बल ५१३८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. पीएनबीने २०२६ वर्षासाठी ५१३८ रिक्त पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदवी पूर्ण केलेली असावी. पदवीचा निकाल ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी लागलेला असणे आवश्यक आहे. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना ९४४ रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. महिला उमेदवारांसाठी ही फी ७०८ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच एससी/एसटी/दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर प्रवर्गातील उमेदवारांना २३६ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • मुख्य पानावरील भरती संबंधित लिंकवर क्लिक करा.

  • प्रथम नवीन नोंदणी (रजिस्ट्रेशन) पूर्ण करा.

  • आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून अर्ज पूर्ण करा.

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

More from this category

पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान; आधीच मजुरांची कमतरता आणि त्यातच पावसाचा आणखी फटका.

मतदार राजा जागा हो! तुमचा मतदान हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच नाव सत्यापित करा

सोने स्वस्त! ताई, बाई, आक्का – आता खरेदीची सुवर्णसंधी! 💰✨

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा