SBI Recruitment 2026 : 2273 पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता ते पगार सर्व तपशील जाणून घ्या
State Bank of India मध्ये २२७३ CBO पदांसाठी भरती सुरू असून अर्जाची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ आहे. महाराष्ट्र व मुंबई मेट्रोसाठी ३३०+ जागा उपलब्ध आहेत :
बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी State Bank of India (SBI) ने आकर्षक भरती जाहीर केली आहे. देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ (CBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सुरुवातीला १८ फेब्रुवारी ठेवण्यात आली होती. मात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन बँकेने अर्जाची अंतिम मुदत वाढवून २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत केली आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आणखी वेळ मिळाला असून, बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअरची ही एक उत्तम संधी ठरत आहे.
एकूण २२७३ पदांसाठी भरती
या भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध सर्कल्समध्ये एकूण २२७३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी २०५० जागा नियमित (Regular) स्वरूपातील आहेत, तर २२३ जागा मागील वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बॅकलॉग (Backlog) श्रेणीतील आहेत.
विभागनिहाय (Circle-wise) रिक्त पदांची माहिती
या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या १९४ पदे रिक्त असून त्यासाठी भरती केली जाणार आहे.
मुंबई मेट्रो सर्कल (मुंबई आणि गोवा) येथे १४३ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय इतर सर्कल्समधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
-
अहमदाबाद – २००
-
बंगळुरू – ३००
-
भोपाळ – १५०
-
चंदीगड – २५०
-
चेन्नई – २००
-
उत्तर पूर्व – १७५
-
हैदराबाद – ५०
-
जयपूर – १००
-
कोलकाता – २००
-
लखनऊ – ५०
-
नवी दिल्ली – ७०
अशा प्रकारे देशभरातील एकूण १६ सर्कल्समध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
पात्रतेचे निकष
शैक्षणिक अर्हता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवीधारकांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
अनुभव:
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवाराकडे कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत (RRB) अधिकारी पदावर किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. शासनाच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
भाषा अर्हता:
उमेदवार ज्या सर्कलसाठी अर्ज करतो, त्या भागातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी).
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडेल.
-
प्रथम मार्च २०२६ मध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा (Objective + Descriptive) घेतली जाईल.
-
परीक्षेत यशस्वी उमेदवारांची कागदपत्रांची छाननी (Screening) केली जाईल.
-
त्यानंतर मुलाखत आयोजित केली जाईल.
-
शेवटी स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत State Bank of India च्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.bank.in/web/careers) जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
-
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क: ७५० रुपये
-
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: विनामूल्य
ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्याची उत्तम संधी ठरू शकते.