व्हॉईस महाराष्ट्र LIVE : बारामतीत पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रवादींची जमावबंदी; रोहित पवारांची DGCA विरोधात अधिकृत तक्रार!
Maharashtra Politics Live Updates Today:
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सखोल चौकशीची मागणी करत आक्रमक झाले आहेत. बारामतीमध्ये रोहित पवार यांनी DGCA विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
NCP President Election:
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज आयोजित करण्यात आली असून, प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Rohit Pawar in Baramati:
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी DGCA आणि VSR या विमान कंपन्यांविरोधात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तत्काळ गुन्हा नोंद न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी