voicemaharashtralive.news

News Header

Eknath Shinde : ‘मला कोपऱ्यात कोणी टाकलं?’ भाषण संपताच एकनाथ शिंदे संतापले; भर मंचावर नेमकं काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 10:43

Eknath Shinde : ‘मला कोपऱ्यात कुणी टाकलं?’ भाषण संपताच एकनाथ शिंदे संतापले; भर मंचावर आयोजकांना सुनावलं!

Eknath Shinde Dasara Melava : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, भाषण संपल्यानंतर मंचावरील एका गोष्टीमुळे शिंदे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आपल्याला मंचाच्या कोपऱ्यात उभे केल्याबद्दल त्यांनी आयोजकांना सर्वांसमोरच खडे बोल सुनावले. या घटनेमुळे दसरा मेळाव्यातील राजकीय भाषणासोबतच शिंदेंच्या नाराजीचीही चर्चा रंगली.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांनीच मतांची चोरी केल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

भाषण संपताच एकनाथ शिंदे आयोजकांवर भडकले

दसरा मेळाव्यातील भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना अभिवादन करत होते. मात्र, त्याचवेळी मंचावरील व्यवस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला लोकांसमोर उभे करण्याऐवजी मंचाच्या एका बाजूला का ठेवण्यात आले, असा सवाल त्यांनी आयोजकांना केला.

‘अरे आयोजन कुणी केलं? मला कोपऱ्यात कुणी टाकलं? पुढच्या वेळी मला लोकांच्या समोर पाहिजे, हे लक्षात ठेवा,’ अशा शब्दांत शिंदेंनी आयोजकांना सुनावले. भर मंचावर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांना सुनावले

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. सरकार केवळ घोषणा करत नसून प्रत्यक्ष मदत पोहोचवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या घरातील चूल पेटती राहावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. आम्ही केवळ भाषण करणारे नाही, तर शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि आवश्यक मदत पुरवणारे आहोत. तुम्ही शेतकऱ्यांना साधा बिस्किटाचा पुडा तरी दिला आहे का, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

आपल्यावर सातत्याने टीका होत असली तरी त्या टीकेला शब्दांनी नव्हे, तर कामातून उत्तर देणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधा देण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच परभणीमध्ये २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही मदतीचा हात पुढे करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. गरजू शेतकरी कुटुंबांतील मुलींसाठी सामूहिक विवाहसोहळ्यांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देणार

आपल्यावर दररोज टीका केली जात असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, टीकेमुळे विकासकामे थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी, महिला आणि गरजू कुटुंबांसाठी विविध योजना राबवण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले उपक्रम आणि भाषणानंतर आयोजकांवर व्यक्त केलेली नाराजी यामुळे एकनाथ शिंदे चर्चेत आले.

More from this category

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना फोन; थेट आरोप करत म्हणाले, “आपला कोण…”

मुंबईत ATS ची कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहिममधून एकाला अटक

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा