voicemaharashtralive.news

News Header

अमेरिकेचा टॅरिफ कपात निर्णय; सोने-चांदीच्या दरात जोरदार चढ-उतार, आजचे ताजे भाव काय ?

Tuesday, 03 February 2026, 10:44

India US Trade Deal: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व्यापार करार अखेर पूर्ण, ट्रम्प यांची घोषणा

Gold rate Silver rate today: 

सोमवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला आयात कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मंगळवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी नोंदवली गेली. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये सुमारे 2200 अंकांची, तर निफ्टीमध्ये 700 अंकांची वाढ झाली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय निर्यात क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून त्याचे सकारात्मक परिणाम थेट भांडवली बाजारावर उमटताना दिसत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. याचवेळी सराफा बाजारातही किमतींमध्ये वाढ दिसून आली. (India–US Trade Deal)

दरम्यान, वायदा बाजार सुरू होताच चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून एका किलो चांदीचा भाव जवळपास 20 हजार रुपयांनी वाढून अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चढउतारामुळे चर्चेत असलेल्या सोन्याच्या किमतीतही आज वाढ नोंदवली गेली. बाजार उघडताच सोन्याचा दर प्रतितोळा साडेचार हजार रुपयांनी वाढला असून, सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

India–US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे नेमके काय बदलले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री सोशल मीडियावरून भारतावर लागू असलेला आयात कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे भारतीय निर्यात क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून उद्योगजगतामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज माझ्या जिवलग मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता केवळ 18 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याची बातमी सुखद आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल भारतातील 1.4 अब्ज नागरिकांच्या वतीने मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार मानतो.”

US Tariff Cut for India: व्यापार करारातील विरोधाभास नेमका काय?

• ट्रम्प यांनी व्यापार करारावर सहमती झाल्याचा दावा केला असला, तरी पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेत संपूर्ण व्यापार कराराचा उल्लेख नाही; त्यांनी केवळ टॅरिफ 18% करण्याबद्दल आभार मानले आहेत.

• ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार आहे; मात्र मोदींच्या ट्विटमध्ये यासंदर्भात कोणताही उल्लेख आढळत नाही.

• ट्रम्प यांनी असा दावा केला की भारत अमेरिकेकडून (आणि व्हेनेझुएलाकडून) तेल खरेदी करेल; मात्र पंतप्रधान मोदींच्या निवेदनात याची पुष्टी नाही.

• ट्रम्प म्हणाले की भारत अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ शून्य टक्क्यांपर्यंत कमी करेल; परंतु मोदींच्या ट्विटमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही.

• ट्रम्प यांच्या मते भारत व्यापारातील अडथळे दूर करणार आहे; मात्र मोदींकडून या दाव्याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

• ट्रम्प यांनी भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने आणि कोळसा प्राधान्याने खरेदी करेल असे सांगितले; मात्र या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा