राजपाल यादव यांना १.११ कोटींची मदत मिळाली, तरीही कर्ज बाकीच आहे.
राजपाल यादवला मोठी मदत; तरी डोक्यावर किती कर्ज बाकी?
Rajpal Yadav सध्या गंभीर आर्थिक अडचणीत अडकले असून चेक बाऊन्स प्रकरणामुळे त्यांनी Tihar Jail येथे आत्मसमर्पण केले आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठी रक्कम कर्ज स्वरूपात घेतली होती; मात्र तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर त्यांना ते कर्ज फेडणे शक्य झाले नाही. परिणामी कायदेशीर कारवाई झाली आणि त्यांनी तुरुंगात हजेरी लावली. अधिकाऱ्यांसमोर ते भावूक होत “मी पूर्णपणे एकटा पडलो आहे, माझ्याकडे पैसे नाहीत आणि मदतीला कोणी मित्रही नाही,” अशी खंत व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
या कठीण काळात Sonu Sood यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांना राजपाल यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतःही काही आर्थिक मदत केली. त्यानंतर ‘जेमट्युन्स म्युझिक’ कंपनीचे मालक Inderjit Singh Yadav यांनी १.१ कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली.
‘IANS’शी संवाद साधताना इंदरजीत सिंह यादव म्हणाले की, “राजपालजींनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा भाग आहेत. ही मदत केवळ पैशांपुरती मर्यादित नसून, गरजेच्या वेळी आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची भावना यात आहे. आमची इंडस्ट्री हे एक कुटुंब आहे आणि संकटाच्या वेळी कुटुंबीय एकमेकांना साथ देतात.” त्यांनी इन्स्टाग्रामवरही पोस्ट करून इतर कलाकारांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वी Gurmeet Choudhary तसेच जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष Tej Pratap Yadav यांनीही राजपाल यादव यांना आर्थिक मदत केली आहे.
२०१० मध्ये Rajpal Yadav यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी M. S. Murali Projects Private Limited कडून तब्बल पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ‘Ata Pata Lapata’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः राजपाल करत होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
व्याज, दंड आणि विलंब शुल्कामुळे मूळ रकमेवर थकबाकी वाढत जाऊन ती जवळपास ९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी कर्जदात्याला अनेक धनादेश दिले; परंतु ते चेक्स बाऊन्स झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. परिणामी, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यान्वये त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, २ फेब्रुवारी २०२६ रोजी Delhi High Court ने राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. अखेरीस ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार आत्मसमर्पण केले.