कोर्टाच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाच्या आणि वादग्रस्त आदेशाला मंजुरी दिली, ज्यामुळे सर्व देशांवर परिणाम होणार आहे
गेल्या काही दिवसांत जगभर टॅरिफच्या मुद्द्यावर वाद सुरू होता. अमेरिकेने अनेक देशांवर जादा कर लावले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला असून सर्व देशांवर लागू असलेल्या जादा टॅरिफचा धोका कमी होताना दिसत आहे :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांवर कठोर निर्बंध लावताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे न मानणाऱ्या देशांवर मोठे टॅरिफ लागू केले जात आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिका नाराज होती आणि भारताने ती खरेदी थांबवावी यासाठी दबाव टाकत होती. मात्र भारताने अमेरिकेचे म्हणणे न मानल्याने भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. नंतर तो कमी करून 18 टक्क्यांवर आणण्यात आला, पण यामागे मोठे राजकीय आणि आर्थिक गणित असल्याचे सांगितले जाते.
भारतासोबतचा व्यापार करार पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी अमेरिकेने टॅरिफमध्ये सवलत दिल्याचे म्हटले जाते. ट्रम्प केवळ भारतालाच नव्हे तर इतर अनेक देशांनाही टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकत असल्याचे दिसते. दरम्यान, अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांना धक्का देत हे टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आणि इतका मोठा कर लावता येणार नाही, असे स्पष्ट केले.