GAIL: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! ‘गेल’ इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत वेतन
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. गैल (इंडिया) लिमिटेडने अभियंता पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. GATE-2026 च्या गुणांच्या आधारे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
या भरती मोहिमेत विविध विभागांतील एकूण ७० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) – १७ जागा, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) – २१ जागा, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – १६ जागा आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मेकॅनिकल) – १६ जागांचा समावेश आहे. अधिक तपशीलांसाठी गैल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पात्रता :
सर्व पदांसाठी उमेदवारांनी संबंधित अभियांत्रिकी शाखेत किमान ६५ टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच GATE 2026 मधील संबंधित विषयाचा पेपर दिलेला असणे आवश्यक आहे.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल): केमिकल / पेट्रोकेमिकल्स / केमिकल टेक्नॉलॉजी पदवी (GATE पेपर: CH)
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन): इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी (GATE पेपर: IN)
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल किंवा संबंधित शाखेतील पदवी (GATE पेपर: EE)
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मेकॅनिकल): मेकॅनिकल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (GATE पेपर: ME)
वेतन:
निवड झालेल्या उमेदवारांना ‘गेल’ इंडियामध्ये आकर्षक आणि स्पर्धात्मक वेतन दिले जाईल. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी वेतनश्रेणी ₹६०,००० ते ₹१,८०,००० दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया:
-
सर्वप्रथम गेल इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
-
त्यानंतर “Recruitment” या विभागावर क्लिक करा.
-
पुढे “GATE-2026 Executive Recruitment” या लिंकवर जा.
-
ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी पूर्ण करा.
-
आवश्यक शैक्षणिक माहिती, GATE-2026 नोंदणी क्रमांक भरा आणि फोटो व स्वाक्षरी अपलोड करून अर्ज सादर करा.