voicemaharashtralive.news

News Header

पंकज भोयर : प्रणित मोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गृह विभागाकडून जुन्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, पंकज भोयर यांचा इशारा — म्हणाले…

Saturday, 13 June 2026, 12:01

कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, गृह विभागाकडून त्यांच्या यापूर्वी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओंची चौकशी करण्यात येणार आहे. जुन्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Pankaj Bhoyar On Pranit More Stand Up Comedian Row:

कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील ‘370 रुपयांची बिर्याणी’ आणि डॉक्टर सेजल पवार यांच्याशी संबंधित मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला असून मोठा वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणी डॉ. सेजल पवार यांनी KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला आहे. तसेच स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीसोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कॉमेडियन प्रणित मोरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. “ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला माफ करा आणि पुन्हा एक संधी द्या. मी नक्कीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेन,” असे प्रणित मोरे यांनी म्हटले आहे.

मात्र, आता प्रणित मोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून त्यांच्या यापूर्वी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओंची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. तसेच जुन्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pankaj Bhoyar On Pranit More : ‘प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेट, नक्कीच कारवाई होणार

‘विनोद न करता विकृती करत असाल, तर थेट कारवाई होईल’ असा सज्जड दम गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. ३७० ची बिर्याणीची वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि डॅा. तेजस पवारवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.’प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेट अपलोड केला तर यापुढे कारवाई होणार. असेही पंकज भोयर म्हणाले.

केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर तरुणीच्या वक्तव्याप्रकरणी चौकशीचे आदेश (KEM Hospital Inquiry Statement Made By Sejal Pawar)

डॉक्टर सेजल पवारनं आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असली तर हे प्रकरण त्यांना भोवणार असंच दिसतंय. केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानं सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. त्यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडून दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आलीय. संबंधित व्हिडीओ तसंच त्यातील कथित वक्तव्यांची या समितीकडून पडताळणी केली जातेय. शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना चौकशी समितीला देण्यात आल्यात. 

नेमका काय आहे 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद? (Pranit More Stand Up Comedian Row)

हा वाद प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे सुरू झाला. या व्हिडीओमध्ये हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने एका महिलेला डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला होता.  ‘चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले आता वसूल तर करावे लागतील ना..’ असं म्हणत त्याने त्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून  शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित करणारे वक्तव्य केले. या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी या वक्तव्याला महिलांविरोधी, अपमानास्पद आणि संमतीच्या संकल्पनेला धक्का देणारे म्हटले. वाद केवळ हिमांशूपुरता मर्यादित राहिला नाही. शोदरम्यान त्या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांमुळे प्रणित मोरेलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांना ‘कॉमेडी’च्या नावाखाली थारा देऊ नये, असंही म्हटलं. सोशल मीडियावर होणाऱ्या या सगळ्या प्रकारामुळे प्रणित मोरेला माफी मागावी लागली. हा वाद तरीही इतका वाढला की त्याने थेट instagram अकाऊंटच बंद करून टाकलं. 

 
 

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

Navi Mumbai : तलवार-चॉपरने तरुणावर जीवघेणा हल्ला; मुलाला वाचवताना आईही जखमी, कोपरखैरणेत खळबळ

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा