voicemaharashtralive.news

News Header

फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…

Wednesday, 24 June 2026, 11:59
 
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतंत्र गट करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावणे पाठवले आहे. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी न देण्याची विनती ठाकरे गटाने केली होती. याविषयीचे पत्र ज्या दिवशी व्हीप बजावून उद्धव सेनेचे बैठक बोलावण्यात आली होती, त्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले होते. त्यानंतर सहाही खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला भेटीसाठी (Lok Sabha Speaker Om Birla on Uddhav Thackeray Shiv Sena) बोलावले आहे. या भेटीतून काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
 
 

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा