voicemaharashtralive.news

News Header

पोलिसांसमोर सिया गोयल हिने उघड केले मोठे गुपित, पोलिसही चक्रावले, थेट केतन अग्रवाल याच्या..

Thursday, 25 June 2026, 10:24

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आता सिया गोयल पोलिस तपासात सर्व प्लॅनिंग सांगताना दिसत आहे. यादरम्यान सिया गोयल हिने झोप उडवणारा खुलासा केला.

पुण्याचा केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांनी आपला गुन्हा मान्य केला. यासोबतच त्यांचा किती भयंकर प्लान केतन अग्रवाल याला मारण्यासाठी होता, ते देखील उघड केले. मुख्य आरोपी चेतन चाैधरी हा पोलिस तपासात फिरवा फिरवीची उत्तरे देत आहे. त्याने आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा संशय येऊ नये, याकरिता आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. आपल्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमार याचा फोन त्याने घेतला होता. काही तास हा फोन त्याच्याकडेच होता. याच फोनच्या माध्यमातून तो सिया गोयल हिच्या संपर्कात होता. केतन अग्रवाल याला धक्का देण्यापूर्वी आणि नंतरही. त्यानंतर त्याने हा फोन नीरजच्या स्वाधीन केला. आपण दिवसभर दुकानातच असल्याचे त्याने भासवले. आता सिया गोयल हिने पोलिस तपात चकावणारी माहिती दिली.

सिया गोयल हिने यापूर्वीही लोहगडावरून केतन अग्रवाल याला ढकलण्याचा प्लान तयार केला. मात्र, तो फसला आणि चेतन अग्रवाल वाचला. त्यानंतर 18 जूनला तिने पुन्हा एकदा केतन अग्रवाल याला लोहगडावर नेले. तिथे सियाने त्याला धक्का दिला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला. जर तो देखील प्लान यशस्वी झाला नसताना तर चेतन आणि सिया यांच्याकडे अपघातात त्याचा जीव घेण्याचा प्लान होता.

जर 18 जूनलाही केतन जिवंत राहिला असता तर अपघाताचा बनाव करत त्याला संपवण्याचा प्लान चेतन आणि सिया यांचा होता. एकीकडे केतन याच्या घरात केतन आणि सिया यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये महाल बुल करण्यात आला होता. थेट 2 विमानेही नातेवाईकांना उदयपूरला नेण्यासाठी बुक करण्यात आली होती. कोट्यावधी रूपयांचा पूर्ण महाल बुक होता.

अग्रवाल कुटुंब शाही पद्धतीने आपला लेक केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे लग्न करण्याची तयारी करत होते. मात्र, सिया आणि तिचा प्रियकर यांचे थेट कोणत्याही परिस्थितीमध्ये चेतन अग्रवाल याला संपवण्याचे ठरले होते. पोलिस तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अजून काही मोठे खुलासे सिया आणि चेतन करू शकतात.

 

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा