अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव
Saturday, 25 July 2026, 12:36
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या आंदोलनाने आता नवे वळण घेतले आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख मागण्यांसाठी अभिजीत दिपके उपोषणावर बसले असून, या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असली तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनादरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचदरम्यान, अभिजीत दिपके यांच्या बहिणी स्नेहा जितिन वंजारे यांनी थेट राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख करत, अभिजीत दिपके यांच्या जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
More from this category
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”
पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय
अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल