voicemaharashtralive.news

News Header

मनोज जरांगे पाटलांच्या डिफेंडरची पोलिसांकडून तपासणी; तपासणीमागचं मोठं कारण समोर

Wednesday, 16 September 2026, 10:41

मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडरची पोलिसांकडून तपासणी; सुरक्षेच्या कारणास्तव बॉम्बशोधक पथक तैनात

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून, मुंबईत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या प्रवासादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ते ज्या डिफेंडर वाहनातून प्रवास करत आहेत, त्या वाहनाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.

सुरक्षेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथकाने जरांगे पाटील यांच्या वाहनाची कसून तपासणी केली. यावेळी वाहनाचे हेडलाईट, इंजिन तसेच गाडीच्या विविध भागांची तपासणी करण्यात आली.

घातपात किंवा कोणत्याही संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही व्हीआयपी सुरक्षा तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रवासाचा आजचा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे असणार आहे.

More from this category

मराठवाडा MLC निकाल: शिंदेंच्या नेत्यामुळे राष्ट्रवादीला धक्का? राजकीय समीकरणे बदलली; महायुतीत संघर्षाची शक्यता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना फोन; थेट आरोप करत म्हणाले, “आपला कोण…”

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा