voicemaharashtralive.news

News Header

Sharad Pawar NCP : रोहिणी खडसेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या महिला अध्यक्षाची नियुक्ती; नाव निश्चित

Friday, 18 September 2026, 10:52

Sharad Pawar NCP Women Wing President: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अंजली साळवे; रोहिणी खडसेंनंतर नवी जबाबदारी

अक्षय मंकणी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीत लवकरच महत्त्वाचा बदल होणार आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता विदर्भाकडे सोपवण्यात येणार असून, नागपूर विभागातून नव्या महिला प्रदेशाध्यक्षांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रोहिणी खडसे यांनी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अंजली साळवे यांची नियुक्ती होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रोहिणी खडसे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता महिला आघाडीची जबाबदारी डॉ. अंजली साळवे यांच्याकडे सोपवली जाणार आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांना पक्षाकडून पुढे कोणती जबाबदारी दिली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्यात आघाडीवर

डॉ. अंजली साळवे या पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीवरून त्यांनी यापूर्वी जोरदार भूमिका मांडली होती.

महिलांसाठी काम करणाऱ्या तसेच महिलांशी संबंधित कायद्यांचे ज्ञान असलेल्या महिलांनाच महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या पदाचा वापर केवळ महिलांच्या पुनर्वसनासाठी न करता महिला विषयक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी व्हावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

लक्ष्मण बांदल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्योजक लक्ष्मण बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

लक्ष्मण बांदल यांनी यापूर्वी हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. पक्षाचे संघटन आणि कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

More from this category

ठाकरे गटाचा मोठा निर्णय! दुपारी 3 वाजता नेमकं काय घडणार? राजकीय वर्तुळात खळबळ!

मराठवाडा MLC निकाल: शिंदेंच्या नेत्यामुळे राष्ट्रवादीला धक्का? राजकीय समीकरणे बदलली; महायुतीत संघर्षाची शक्यता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा