voicemaharashtralive.news

News Header

Thackeray Brothers : कालच्या आंदोलनानंतर दोन्ही युवा ठाकरे बंधूंना पोलिसांचा दणका!

Monday, 12 October 2026, 10:44

Thackeray Brothers : आंदोलनानंतर आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता

देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनात आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट तसेच बाचाबाची झाली. पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आंदोलकांच्या सुटकेसाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली.

मात्र, या आंदोलनानंतर आता आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनादरम्यान सुमारे 300 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलकांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे यांनी सेना भवन परिसरात ठिय्या दिला होता. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधूंविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचे बंधू तेजस ठाकरेही प्रथमच अशा आंदोलनात सार्वजनिकरीत्या सहभागी झाले. तेजस ठाकरे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी कालच्या आंदोलनातील त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधले. पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर आदित्य आणि अमित ठाकरे यांनी गाडीच्या छतावर चढून उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

दरम्यान, आज पुन्हा दादर-शिवाजी पार्क परिसरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. मनसेकडून सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून, त्यापूर्वी सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

“आंदोलनकर्त्यांना आम्ही सलाम करतो” – आदित्य ठाकरे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी SIR प्रक्रियेत झालेल्या कथित बदलांचा आणि मतदारांच्या नावांमध्ये झालेल्या वगळण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.

“जे आंदोलनकर्ते आहेत, त्यांना आम्ही सलाम करतो. उद्याचे आंदोलन कुठे असेल, हे लवकरच सांगू. सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची राहील,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

More from this category

मराठवाडा MLC निकाल: शिंदेंच्या नेत्यामुळे राष्ट्रवादीला धक्का? राजकीय समीकरणे बदलली; महायुतीत संघर्षाची शक्यता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना फोन; थेट आरोप करत म्हणाले, “आपला कोण…”

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा