जगाला हादरवणारी मोठी विमान दुर्घटना! क्षणात इतक्या जणांचा मृत्यू, सर्वत्र हाहाकार
एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला; नायजेरियन लष्करी विमानाचा भीषण अपघात, 32 जणांचा मृत्यू
नुकत्याच घडलेल्या एका भीषण विमान दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानंतर नायजेरियाच्या लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात 25 प्रवासी आणि सात कर्मचारी असे एकूण 32 जण असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानातील कोणाचाही जीव वाचला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बेनिन सिटीहून लागोसच्या दिशेने नियमित मोहिमेवर निघालेले नायजेरियन लष्कराचे ATR 42 विमान नैऋत्य नायजेरियातील ओंडो राज्यात कोसळले. विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क अचानक तुटल्यानंतर ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
नायजेरियाचे नागरी उड्डाण मंत्री फेस्टस कियामो यांनी या घटनेची माहिती दिली. दुर्घटनेनंतर इग्बोकोडा या किनारी शहराजवळ विमानाचे अवशेष आढळून आले. घटनास्थळी शोध आणि बचाव पथके तातडीने रवाना करण्यात आली होती.
या दुर्घटनेत विमानातील सर्व 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर नायजेरियात शोककळा पसरली आहे. राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या घटनेपूर्वी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील कथित धक्कादायक प्रकाराचीही चर्चा सुरू होती. या विमानात भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी गंभीर परिस्थितीत दाखवलेल्या धैर्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या घटनेशी नायजेरियन लष्करी विमान दुर्घटनेचा थेट संबंध नाही.
सलग समोर येणाऱ्या विमान दुर्घटनांच्या आणि विमान सुरक्षेशी संबंधित घटनांमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नायजेरियन विमान दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.