voicemaharashtralive.news

News Header

किल्ले शिवनेरी येथे शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून मुख्यमंत्रीांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे.

Thursday, 19 February 2026, 11:29

व्हॉइस महाराष्ट्र LIVE : शिवजयंती विशेष थेट बातम्या :

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती

मध्यरात्री गोंधळाची परिस्थिती निर्माण; काही शिवभक्त जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

 

राज्यात आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी तसेच देशभरातील आणि महाराष्ट्रातील अनेक नेते, अभिनेते आणि नामवंत व्यक्तींनी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या; मात्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

शिवजयंतीमुळे शिवनेरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रात्रीच्या वेळी काही जण गड उतरत असताना एका व्यक्तीचा तोल जाऊन तो घसरल्याची घटना घडली, त्यामुळे मागून येणाऱ्या काही जणांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. मात्र, किल्ल्यावर कोणतीही मोठी चेंगराचेंगरी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय, राज्यातील राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगद्वारे दिले जात आहेत.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा