voicemaharashtralive.news

News Header

Ketan Agarwal Murder Case : सियाने भरभरून केलं होतं कौतुक; केतनच्या चेहऱ्यावरील आनंदाचा साखरपुड्यातील व्हिडीओ चर्चेत

Tuesday, 21 July 2026, 15:16

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल यांच्या साखरपुड्यातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साखरपुडा समारंभातील या व्हिडिओमध्ये सिया केतनचे कौतुक करताना दिसते. कार्यक्रमादरम्यान एका सूत्रसंचालिकेने सियाला, “केतनमध्ये तुला सर्वात आवडणारी गोष्ट कोणती?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर सियाने हसत “He is very caring and kind” असे उत्तर दिले. तिचे हे शब्द ऐकताच केतनच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.

सियाच्या या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले होते. मात्र, काही महिन्यांनंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हा व्हिडिओ आता अधिक चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत असून, सध्या या प्रकरणाचा पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा