फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…
Wednesday, 24 June 2026, 11:59
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतंत्र गट करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावणे पाठवले आहे. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी न देण्याची विनती ठाकरे गटाने केली होती. याविषयीचे पत्र ज्या दिवशी व्हीप बजावून उद्धव सेनेचे बैठक बोलावण्यात आली होती, त्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले होते. त्यानंतर सहाही खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला भेटीसाठी (Lok Sabha Speaker Om Birla on Uddhav Thackeray Shiv Sena) बोलावले आहे. या भेटीतून काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
More from this category
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर
Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण
अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव