voicemaharashtralive.news

News Header

US–Iran तणाव: Donald Trump यांचे विधान – इराण युद्धात अमेरिकेची कामगिरी १० पैकी १५; “आमची ताकद अजूनही कायम.”

Thursday, 05 March 2026, 11:37

US–Iran Crisis: इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची कामगिरी उत्कृष्ट असल्याचा दावा Donald Trump यांनी केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या कारवाईला १० पैकी तब्बल १५ गुण देत, “आम्ही अजूनही खूप मजबूत स्थितीत आहोत :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी बुधवारी इराणविरोधातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या युद्धात अमेरिकेची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आहे. त्यामुळेच त्यांनी अमेरिकेच्या कामगिरीला १० पैकी थेट १५ गुण दिले. तसेच इस्रायलसोबत मिळून पुढील कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हाइट हाऊसमधील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका आणि तिचे सहयोगी या संघर्षात मजबूत स्थितीत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, युद्धाच्या सुरुवातीपासूनच आमची कामगिरी चांगली राहिली आहे. जर कोणी मला विचारले की १० पैकी किती गुण द्याल, तर मी जवळपास १५ गुण देईन, असे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी असेही म्हटले की या संघर्षात इराणचे नेतृत्व कमकुवत होत आहे. सध्या अमेरिका अत्यंत मजबूत स्थितीत असून परिस्थिती वेगाने बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Donald Trump यांनी पुन्हा स्पष्ट केले की इराणवरील कारवाईचा मुख्य उद्देश अण्वस्त्र मिळवण्यापासून त्यांना थांबवणे हा आहे. ते म्हणाले, “जेव्हा एखाद्या देशाकडे अण्वस्त्र असतात, तेव्हा परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते.” तसेच बराक ओबामा यांच्या काळात इराणसोबत झालेला अण्वस्त्र करार हा आतापर्यंतचा सर्वात वाईट करार होता, अशी टीकाही त्यांनी केली.

 
 

More from this category

पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर मोठा धक्का! एका रात्रीत 21 अधिकारी-कर्मचारी निलंबित; प्रशासनाची धडक कारवाई

कपूरथला राजघराण्याच्या मालमत्ता वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; गादी वेगळी आणि संपत्ती वेगळी

मायक्रोसोनी : आधुनिक कार्यक्षेत्रांसाठी ऑफिस चेअर्स आणि कंपोनंट्स क्षेत्रातील पुण्याचा विश्वासार्ह ब्रँड

LPG नियमांमध्ये मोठा बदल! PNG कनेक्शन घेतल्यानंतरही LPG सुरू ठेवता येणार; ग्राहकांना मोठा दिलासा

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा