वाघाची गर्जना पुन्हा एकदा! ओमराजे निंबाळकरांच्या स्वागतासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात बॅनरबाजी
वाघाची गर्जना पुन्हा एकदा! ओमराजे निंबाळकरांच्या स्वागतासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात बॅनरबाजी
सोशल मीडियावर राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात झळकलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्यापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनरने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या या बॅनरबाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा राज्यासह देशभरात रंगली आहे. या मोहिमेमुळे शिवसेना (ठाकरे गट) मध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गटाने जारी केलेल्या व्हीपनंतर बोलावण्यात आलेल्या बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हे सहा खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या संभाव्य बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव घेतले जात आहे.
दरम्यान, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच तुळजापूरमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे बॅनर्स झळकल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनर्सने नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेतले असून, आगामी राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका अधिकृतपणे जाहीर करण्यापूर्वीच त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघातच स्वागताचे भव्य बॅनर्स झळकले आहेत.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी हे बॅनर्स लावले असून, त्यावर “वाघ चालला वाघाच्या कळपात!” असा लक्षवेधी संदेश देण्यात आला आहे. या बॅनरबाजीमुळे ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला असून, संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळातही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी भूमिका स्पष्ट केली
दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले.
महायुती सरकारच्या कामकाजाचे कौतुक करताना ओमराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये वावरत आहेत. ते मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत असल्याचे दिसून येते. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सर्वत्र फिरणे शक्य नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी अधिक परिश्रम घेणे अपेक्षित होते.”
पक्षांतराच्या चर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, “सध्या मी मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्टिकोनातून पक्ष सोडण्याचा निर्णय योग्य वाटत नाही; मात्र राजकीयदृष्ट्या तो योग्य ठरू शकतो. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्यावर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात दबाव आहे. तथापि, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील न्यायालयीन निकाल आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. माझी भूमिका २० जूननंतर जाहीर करेन.”